Wednesday, July 20, 2016

Criminal offence aginst Mohan Regency Builder

मोहन रिजन्सी बिल्डरला दणका


Click Here to read the original news

बनावट कुलमुखत्यारपत्राच्या आधारे बांधकाम परवानगी आणि टीडीआर लाटणाऱ्या विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करतानाच त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले. या आदेशान्वये १० वर्षांपूर्वी पूर्णत्वाचा दाखला घेतलेल्या मोहन रिजन्सी को. ऑप. हौ. सोसायटीची बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वालधुनी येथील टीडीआर घोटाळा गाजत असतानाच आता नवा टीडीआर घोटाळा उघड झाला आहे. वाडेघर येथील राजकोटवाला यांच्या भूखंडाचे कुलमुखत्यारपत्र बनवून त्याच्या आधारे लॅण्डमार्क कंस्ट्रक्शनचे विकासक विक्रम शहा व निलेश पारेख यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून २००२मध्ये बांधकाम परवानगी तसेच वाढीव चटई क्षेत्र मिळविले होते. या परवानगीच्या आधारे संबंधित विकासकाने मोहन रिजन्सी उभारली. २०१३मध्ये या जागेचा गैरप्रकार करत खोटा टीडीआर मिळविल्याप्रकरणी अंजुम खान आणि श्रीनिवास घाणेकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीदरम्यान विकासक कुलमुखत्यारपत्राची मूळ प्रत सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे हे कुलमुखत्यारपत्र खोटे असल्याचे स्पष्ट करत त्याच्या आधारे घेतलेली बांधकाम परवानगी आणि मिळविलेला टीडीआर आयुक्तांनी रद्द केला. पालिकेची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment